व्ही शांताराम
ISBN: 978-81-970053-9-8
लेखक : गिरीश घाटे
मूल्य : रु. ३०० (कुरियरचा खर्च समाविष्ट - केवळ भारतात)
भारतीय चित्रसृष्टीत व्ही. शांतारामांचे मोठे योगदान आहे. दादासाहेब फाळके व बाबूराव पेंटर यांची परंपरा पुढे नेत, चित्रपटातून समाजप्रबोधन ही जबाबदारी त्यांनी मांडली. अद्ययावत तंत्र व प्रतीकात्मक शैली यामुळे त्यांचा ठसा उमटला. त्यांनी ७०+ चित्रपटांची निर्मिती, ४४ दिग्दर्शन व २१ चित्रपटांत अभिनय केला.
आबासाहेब गरवारे
ISBN: 978-81-970053-8-1
लेखक : अरविंद म्हेत्रे
मूल्य : रु. ३०० (कुरियरचा खर्च समाविष्ट - केवळ भारतात)
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांत आबासाहेब गरवारे यांचे नाव आदराने घेतले जाते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भालचंद्र दिगंबर गरवारे यांनी आपल्या अथक परिश्रमाने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने उद्योग जगतात एक अतुलनीय यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या, आणि कोणतीही गोष्ट मनोभावे आणि पूर्ण समर्पणाने करण्याची वृत्ती बाळगलेल्या आबासाहेबांच्या जीवनाची ही गाथा निश्चितच प्रेरणादायी आहे.
स्वामी रामानंद तीर्थ
ISBN: 978-81-970053-3-6
लेखक : गिरीश घाटे
मूल्य : रु. ३०० (कुरियरचा खर्च समाविष्ट - केवळ भारतात)
मराठवाड्याचा इतिहास जाणणाऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. निजामाच्या सरंजामशाही राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले. त्यानंतर राज्याचे त्रिभाजन होऊन तेलगू भाषिक भूभाग आंध्र प्रदेशात, कानडी भाषिक प्रांत कर्नाटकात आणि मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राज्याच्या त्रिभाजनात अग्रगण्य नेते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे.
एस. एम. जोशी
ISBN: 978-81-970053-5-0
लेखक : गिरीश घाटे
मूल्य : रु. ३०० (कुरियरचा खर्च समाविष्ट - केवळ भारतात)
‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीत एस.एम. जोशी यांचे महत्वाचे योगदान होते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन मुंबई राजधानी झाली. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’चे सरचिटणीस म्हणून जोशींनी प्रभावी नेतृत्व करून ही मागणी मान्य करून घेतली. १९७५–७७च्या आणीबाणी नंतर लोकशाही पुनर्स्थापनेसाठी जनता पक्ष स्थापन करण्यातही त्यांनी जयप्रकाश नारायण यांचे सहकारी म्हणून मोलाची भूमिका बजावली.
पुस्तक खरेदीसाठी बाजूला दिलेल्या QR कोड वर पेमेंट करा. आपले नाव, पेमेंटची पावती, पुस्तकाचे नाव, कुरियर साठी पत्ता व्हाट्सअपने कळवा.